Accident file photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : महामार्गावर पणदूर येथे कारच्या धडकेत बैलाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर ब्रिज नजिक घटना

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर पणदूर ब्रिज नजिक अचानक कार समोर बैल आल्याने कारला मोठा अपघात झाला. या अपघातात बैलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ८ वा.च्या सुमारास घडली. यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला.

कार  कुडाळ ते सिंधुदुर्गनगरी जात होती. या कार समोर पणदूर ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या जोड रस्त्यानजिक अचानक एक बैल धावत आडवा आला. त्यामुळे कारची त्या बैलाला जोरदार धडक बसली. यात बैल रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा होऊन कारचे मोठे नुकसान झाले. कारमधील एअर बॅग उघडल्याने सुदैवाने कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहीती मिळताचजि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह प्रसाद गावडे, राजेश टंगसाळी, पोलिस पाटील देऊ सावंत, महेश कदम, नारायण (बाबू) सावंत व ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने मृत बैलाचे दफन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT