‘ओंकार’ची दोडामार्ग फोंडिये परिसरात दहशत! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ‘ओंकार’ची दोडामार्ग फोंडिये परिसरात दहशत!

भरवस्तीत घुसून घरासमोर उभी कार सुळ्यांवर उचलून आदळली

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : गोव्यातून सिंधुदुर्गात परतलेल्या ‘ओंकार’ हत्तीने दोडामार्ग-फोंडिये परिसरात दहशत माजवली. येथे उभ्या एका कारवर हल्ला चढवत ती सुळ्यांनी उचलून जमिनीवर आदळली. यात ओगले कुटुंबीयांच्या कारचे मोठे नुकसान झाले. तब्बल अर्धा तास ओंकार हत्तीचा हा रौद्रावतार सुरू होता. ग्रामस्थांनी आरडाओरडा करून अखेर ओंकारला पिटाळून लावले. मंगळवारी रात्री ९.४५ वा.च्या सुमारास ही घटना घडली.

ओंकार हत्तीने सुळे कारमध्ये घुसवून ती उचलली आणि जोरदारपणे आदळली. हत्तीच्या या आक्रमक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी आरडाओरड करत हत्तीला तेथून पिटाळून लावले. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारच्या नुकसानीचा पंचनामा केला. मात्र, ‘ओंकार’च्या वाढत्या आक्रमकतेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दिवसभर कळणे येथे वाहतूक रोखली

फोंडिये येथील या थरारक घटनेपूर्वीच ‘ओंकार’ने मंगळवारी कळणे परिसरातही धुमाकूळ घातला होता. कळणे मायनिंग गेटसमोर दोडामार्ग-बांदा मार्गावर मधोमध उभा राहत त्याने तब्बल अर्धा तास दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT