Goa Omkar Elephant  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Omkar Elephant : अडीच महिन्यानंतर ‘ओंकार’ कुटुंबात सामील

दोडामार्ग वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : ‘ओंकार’ हत्ती अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्या कुटुंबात सामील झाला आहे. सध्या तो कोलझरच्या जंगलात त्याची आई माही आणि दोन पिल्लांसोबत वास्तव्यास आहे, अशी माहिती दोडामार्ग वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी दिली.

गेल्या अडीच महिन्यांपासून सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यात फिरत असलेला ओंकार चार दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला होता. तो परमे गावात असताना त्याची आई आणि दोन पिल्ले केर गावातील जंगलात होती. त्यांची केर गावात भेट होणे अपेक्षित असताना ओंकार माघारी परतला व सासोली गावात आला. यानंतर त्याची आई आणि दोन पिल्ले कोलझरच्या जंगलात वास्तव्यास असताना ओंकार आणि त्यांची भेट या जंगलामध्ये झाली. तो सध्या आपल्या कुटुंबासमवेत रमला आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल पाटील यांनी दिली. चंदगड तालुक्यात गणेश, बाहुबली, गौरी हे तिघेजण वास्तव्य करत आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT