वेताळ बांबर्डे येथे ९ फुटी अजगराला जीवदान 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : वेताळ बांबर्डे येथे ९ फुटी अजगराला जीवदान

परिसरातील घराच्या आवारात आढळून आला होता अजगर

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-देऊळवाडी येथे घराच्या आवारात आढळून आलेल्या तब्बल ९ फूट लांबीच्या अजगराला वनविभागाच्या आरआरटी पथकाने शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडून जीवदान दिले. बुधवारी दुपारी ३ वा.च्या सुमारास ही घटना घडली.

वेताळ बांबर्डे-देऊळवाडी येथील रहिवासी विनय बांबर्डेकर यांच्या घराकडील आवारात अचानक मोठ्या आकाराचा अजगर आढळून आला. अजगर दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आरआरटी पथकाचे रेस्क्युअर दिवाकर बांबर्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत सर्पमित्र राजू माईणकर व तुषार नाईक यांनीही घटनास्थळी पोहोचून अजगराला सुरक्षितपणे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर या पथकाने अजगराला शिताफीने पकडले. यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अजगराला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT