कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News | जिल्ह्यात चालू आठवड्यात तुरळक पावसाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानामध्ये काही अंशाची घट होऊन ते अनुक्रमे ३१ ते ३२ व २४ ते २५ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.

आर्द्रतेतील वाढीबरोबर वाऱ्याचा वेग वाढून हवामान मुख्यत्वे ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे, अशी माहिती मुळदे कृषी केंद्राने आपल्या हवामानावर आधारित सल्ल्याद्वारे दिली आहे. कृषी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले आहे.

काही ठिकाणी गेले काही दिवस पाऊस गायब आहे. यामुळे शेतात पाण्याची पातळी घटली आहे. मात्र या आठवड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत दरम्यान २१, २२व २३ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या, २४ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या तर २५ सप्टेंबर रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२४ या कालावधी दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसासाठी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून हवामानासंबंधी कोणताही इशारा नाही.

पावसाने उघडीप दिलेली असल्यामुळे आंबा बागेमधील स्वच्छता करावी. वाढलेली झुडुपे काढून घ्यावीत. झाडांच्या सुकलेल्या फांद्या, वेड्यावाकड्या व एकमेकांमध्ये गुंतलेल्या फांद्यांची विरळ छाटणी करुन घ्यावी व त्या ठिकाणी १ टक्का बोर्डो मिश्रण लावावे. ऊस क्षेत्राच्या चारही बाजुंनी व बांधावर हराळी, लव्हाळा इ. तणांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास तणांची बेणणी करावी. हळद पिकामध्ये गरजेनुरुप बेणणी करुन घ्यावी व वेणणी केलेल्या पिकास मातीची भर द्यावी.

भात पिकास पाण्याची कमतरता भासू नये याकरिता शेताची बांधबंदिस्ती करुन भात खाचरात पाणी बांधून घ्यावे व लोंब्या येण्यापूर्वी १० दिवस व लोंब्या आल्यानंतर १० दिवसापर्यंत शेतातील पाण्याची पातळी १० से.मी. पर्यंत ठेवावी असे आवाहन मुळदे कृषी केंद्राने, आपल्या हवामानावर आधारित कृषी सल्ल्याद्वारे केले आहे. सद्यस्थितीत पावसाची पातळी घटल्याने शेतातील पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात घटली होती. मात्र आता या पावसाचा भातशेती, नागली पीक, इतर पिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात असले तरी काही पिकांना उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या पावसाची भातशेती व इतर पिकांना मोठाकाही ठिकाणी गेले काही दिवस पाऊस गायब आहे. यामुळे शेतात पाण्याची पातळी घटली आहे. मात्र या आठवड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत दरम्यान २१, २२व २३ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या, २४ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या तर २५ सप्टेंबर रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२४ या कालावधी दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसासाठी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून हवामानासंबंधी कोणताही इशारा नाही.

पावसाने उघडीप दिलेली असल्यामुळे आंबा बागेमधील स्वच्छता करावी. वाढलेली झुडुपे काढून घ्यावीत. झाडांच्या सुकलेल्या फांद्या, वेड्यावाकड्या व एकमेकांमध्ये गुंतलेल्या फांद्यांची विरळ छाटणी करुन घ्यावी व त्या ठिकाणी १ टक्का बोर्डो मिश्रण लावावे. ऊस क्षेत्राच्या चारही बाजुंनी व बांधावर हराळी, लव्हाळा इ. तणांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास तणांची बेणणी करावी. हळद पिकामध्ये गरजेनुरुप बेणणी करुन घ्यावी व वेणणी केलेल्या पिकास मातीची भर द्यावी. भात पिकास पाण्याची कमतरता भासू नये याकरिता शेताची बांधबंदिस्ती करुन भात खाचरात पाणी बांधून घ्यावे व लोंब्या येण्यापूर्वी १० दिवस व लोंब्या आल्यानंतर १० दिवसापर्यंत शेतातील पाण्याची पातळी १० से.मी. पर्यंत ठेवावी असे आवाहन मुळदे कृषी केंद्राने, आपल्या हवामानावर आधारित कृषी सल्ल्याद्वारे केले आहे.

सद्यस्थितीत पावसाची पातळी घटल्याने शेतातील पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात घटली होती. मात्र आता या पावसाचा भातशेती, नागली पीक, इतर पिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात असले तरी काही पिकांना उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या पावसाची भातशेती व इतर पिकांना मोठा लाभ होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT