दोडामार्ग : मेढे गावातील एका विवाहित तरूणाने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना शनिवारी घडली. सुनील गोविंद गवस (४३) असे मृत युवकाचे नाव असून,यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या निधनाने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास सुनील गवस यांनी कीटकनाशक प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना गोवा-म्हापसा येथील आजिलो रुग्णालयात हलविले. तेथेही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढे गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) बांबुळी येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.