Electric Shock File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Electric Shock Accident : विजेच्या धक्क्यात वायरमन, आजी-नातू गंभीर

सावंतवाडी-कारिवडे, सबनिसवाडा येथे दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : विजेचा धक्का बसल्याने वायरमन तसेच आजी आणि नातू असे तिघे गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना बुधवारी सकाळी घडल्या. यातील गंभीर जखमी वायरमवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात, तर आजी व नातवावर गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वायरमन प्रज्वल नाईक हे सकाळी कारिवडे गावात वीज खांबावर चढून लाईन दुरुस्तीचे काम करत होते. या दरम्यान त्यांना अचानक विजेचा धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सबनीसवाडा परिसरात आजी व नातवाला विजेचा धक्का लागला आहे. भावना भावे (५६) असे त्यांचे नाव असून, त्या सकाळी आपल्या घरात वॉशिंग मशिन लावत असताना त्या ठिकाणी नातू खेळत आला. त्याने अर्थिंगच्या वायरला हात लावल्यामुळे तो त्या ठिकाणी चिकटला. हे समजताच आजी त्याला सोडवण्यासाठी गेली असताना आजीलाही विजेचा धक्का लागला. या घटनेत दोघांना दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT