उदय बापर्डेकर
आचरा : शेकडो वर्षापूर्वीपासून कोकणातील गावपळणीची परंपरा असणाऱ्या गावांपैकी मालवण तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वायंगणी गावात ढोलांचा गजर झाला आणि गावपळण कार्यक्रम सोमवारपासून सुरू झाला. श्री.देव रवळनाथाच्या कौलाने सुमारे २००० हजार वस्तीच्या गाव देवांसहित व रयतेला घेऊन वेशीबाहेर तीन दिवस तीन रात्रींसाठी वास्तव्यास गेला. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली प्राचीन प्रथा आजही आधुनिकतेकडे जाणाऱ्या प्रवाहातही वायंगणी गावातील ग्रामस्थ स्वखुशीने आजही तेवढीच श्रद्धा पूर्वक जपत आहेत.
संस्थानकालीन असलेल्या आचरा गावांमध्ये होणाऱ्या गावपळणीत गावातील ग्रामस्थ फक्त गावाबाहेर जातात. परंतु, वायंगणी गावातील ग्रामदैवत श्री. देव रवळनाथ हे चिंदर सडेवाडी येथे वास्तव्यास गावपळणीच्या दिवशी पहाटेच्या वेळी अगदी चिडीचूप पणे गावातील मानकरी व सेवे करी ग्रामदेवतेचे प्रतीक असलेले श्री फळ घेऊन 2.30 च्या सुमारास मानकऱ्यांसह जातो. त्याठिकाणी असलेल्या घुमटीत देवाचे प्रतिक असलेले श्रीफळ ठेवून त्यांची पुजा अर्चा होते. यावेळी मात्र गावातील देवळात पुजा होत नाही. देवासह गावातील ग्रामस्थ देवाच्या सानिध्यात वेशीबाहेर वास्तव्य करतात. देवपळण व गावपळण यांचा संयुक्त मिलाफ या वायंगणी गावाच्या गावपळणीत पहावयास मिळतो आहे .
श्री देव रवळनाथाच्या कौलाने वेशीबाहेर गेलेला
गाव हा तीन दिवस, तीन रात्री नंतर देव रवळनाथ यांच्या हुकुमाने गाव वेशीबाहेर जातो. तीन दिवसाची मर्यादा 26 रोजी पुर्ण होत असून यावेळी गावाचे बारापाच मानकरी व ग्रामस्थ सकाळी १० च्या सुमारास गाव भरण्याचा कौल होणार आहेत. देवाने कौल दिल्यास वेशीबाहेर गेलेला गाव परत वायंगणी गावात परतनार आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व
जातीपातीचा धर्माचा विसर पडून वायंगणीचे ग्रामस्थ एकोप्याने श्रद्धेने गावपळणीत सहभागी झाले. श्रद्धा म्हणुन गावपळण करत असताना गाव निर्रमनुष्य होऊन गावाचे वातावरण शुद्ध होण्यास ग्रामस्थ एकप्रकारे हातभार लावताना दिसत आहेत. वायंणीतील ग्रामस्थ आचरा हिर्लेवाडी, कालावल, सडयेवाडी, चिंदर, सडेवाडी भागात राहुट्या करून गुरूढोरे, कोंबडी, कुत्रे, मांजर,अन्य लागणाऱ्या साहित्यासह वास्तव्यास वेशीबाहेर रवाना झाले. तीन दिवस, तीन रात्री गावातील ग्रामस्थ एकत्र एकोप्याने राहत निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला सामावून घेतात. यावेळी त्यांना मोबाईल व्हॉटसअॅपचाही विसर पडतो.मागील सण 2019 मध्ये मार्च महिन्यात वायंगणी गावची गावपळण, देवपळण झाली होती.
वायंगणी गावामध्ये सोमवारी गावळण सुरु झाल्यावर काही माहिला घरातील सामानासह पॉवर टिलर मधून जाताना दिसत होत्या.
चिंदर सडेवाडी येथील नियोजीत स्थळी देव तीन दिवस तीन रात्रीसाठी स्थिर झाला आहे.
वायंगणी गावामध्ये सोमवारी गावपळणीला सुरुवात झाल्यावर वेशी बाहेर गुरे घेऊन जाताना ग्रामस्थ.
वायंगणी गावातील ग्रामस्थ आपली घर दारे बंद करून वेशी बाहेर तीन दिवस तीन रात्री साठी जाताना.
वायंगणी गावात गावपळणीस सुरुवात झाल्याने गावातील मंदिरे अशा प्रकारे दरवाजावर झाप लाऊन बंद करून गावातील ग्रामस्थ वेशी बाहेर गेले आहेत.
गावात गावपळणीत अशाप्रकारे घराच्या मुख्य दरवाजावर झाप लाऊन दरवाजा बंद करण्यात आला आहे.