कुडाळात नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात ठाकरे युवासेनेची स्वाक्षरी मोहीम 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : कुडाळात नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात ठाकरे युवासेनेची स्वाक्षरी मोहीम

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

​कुडाळ : नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ठाकरे युवासेनेच्या वतीने कुडाळ हायस्कूलसमोर ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वाक्षरी मोहीम’ राबवण्यात आली. या मोहीमेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित केलेल्या या मोहिमेला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ​नगरसेवक मंदार शिरसाट व पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली. नीट, जेईई आणि टीईटी परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या काळात ठाकरे युवासेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही मंदार शिरसाट व योगेश धुरी यांनी दिली.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, कृष्णा धुरी, माजी उपसभापती जयभारत पालव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, ममता राऊळ तसेच­­­­­ यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT