Sindhudurg News | कातवण समुद्रकिनारी संशयास्पद स्थितीत आढळले ऑक्सिजन सिलेंडर  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News | कातवण समुद्रकिनारी संशयास्पद स्थितीत आढळले ऑक्सिजन सिलेंडर

देवगड पाेलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, पंचनामा केल्यानंतर सिलेंडर घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

देवगड: देवगड तालुक्यातील कातवण समुद्रकिनारी दाेन ऑक्सिजन सिलेंडर व काही साहित्य शनिवारी दुपारच्या सुमारास एका स्थानिक मच्छिमारास आढळून आले. त्यांनी सदर माहिती देवगड पाेलिसांना दिल्यानंतर पाेलिस निरिक्षक श्याम बुवा यांनी पाेलिस कर्मचाऱ्यांंसमवेत घटनास्थळी भेट दिली.घटनेचा पंचनामा करून दाेन सिलेंडरसह व तेथिल इतर सर्व साहित्य ताब्यात घेतले.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कातवण समुद्रकिनारी सिलेंडर सदृश वस्तू व काही साहित्य संशयास्पद स्थितीत असल्याचे तेथिल एका स्थानिक मच्छिमारांनी देवगड पाेलिसांना कळविले. त्यानंतर देवगड पाेलिस निरिक्षक श्याम बुवा, स.पाे.उपनिरिक्षक अनिलकुमार पवार, पाे.काॅ.रविंद्र महाले आदी पाेलिस कर्मचाऱ्यांंसमवेत तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

यावेळी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. हे सिलेंडर ऑक्सिजनचे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट हाेत असून तेथे पाणीपाऊस, प्राेटीन बिस्कीट पॅकेट, स्माेक सिग्नल, हँड फफ्लायर असे साहित्य मिळून आले आहे. समुद्रात वाहतुक करणाऱ्या एखाद्या जहाजावरून अथवा नाैकेवरून ते सिलेंडर व साहित्य पाण्यात पडल्याने ते वाहत समुद्रकिनारी लागले असावेत असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. किनारपट्टीवर काेणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसून आल्यास अथवा काेणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पाेलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पाेलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT