मोकाट गायींच्या गळ्यात रिफ्लेक्टर पट्टे बांधण्यात आले.  
सिंधुदुर्ग

Devgad News | मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांना टाळण्यासाठी ‘रिफ्लेक्टर बेल्ट’चा अभिनव प्रयोग!

भाजप कार्यकर्त्यांनी राबविला उपक्रम ; मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघाताच्या घटना

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात मोकाट जनावरांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली आहे. नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी अपघाताची गंभीर दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी मोकाट जनावरांसाठी कोंडवाडे उभारण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचवेळी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनीही मोकाट जनावरांमुळे होणारा अपघात टाळण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे युवा कार्यकर्ते निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधण्याच्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. रात्रीच्या वेळी वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशात हे बेल्ट दूरवरून चमकत असल्याने वाहनचालकांना रस्त्यावर जनावरे असल्याचा अंदाज वेळेत येणार असून अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे.

या उपक्रमात राजा भुजबळ, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरून मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सुरू झालेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT