कारची दुचाकीला धडक स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : कारची दुचाकीला धडक स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

जुन्या महामार्गावर कोलगाव येथे अपघात

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कोलगाव कामाक्षी स्टील यार्ड येथे भरधाव कारची धडक दुचाकीला बसून अपघात झाला. हा अपघात शनिवारी रात्री ८ वा झाला. या अपघातात राजाराम परशुराम सावंत( ६५, रा. आकेरी -कशेलवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी कार चालकावर अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार चालक कुडाळ ते कारिवडे जात होता जुन्या मुंबई- गोवा महामार्गावर कोलगाव कामाक्षी स्टील यार्ड येथे त्याच्या कारची धडक दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकीस्वार राजाराम परशुराम सावंत हे गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक ग्रामस्थ व कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारांसाठी त्यांना गोवा बांबोळी रुग्णलयात हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचा पंचनामा पोलिस हवालदार मनोज राऊत, मंगेश शिंगाडे यांनी केला. हयगयीने वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालक संजीवन कारिवडेकर याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत श्री.सावंत हे मसुरकर सॉ मिल मध्ये कामास होते. ते दुचाकीने घरी जात असताना हा अपघात झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT