पोलिस 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : पोलिसांचा फोकस आता बांधकाम विभागावर

जिल्हा परिषदेतील बनावट सह्याप्रकरणी कागदपत्रांची जमवाजमव

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील बनावट सह्या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकात ५ ठेकेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आता जि. प. बांधकाम विभागावर लक्ष केंद्रित केले आहे. पोलिसांनी जि. प. प्रशासनाकडे ज्या बिलांवर बनावट सह्या झाल्या होत्या त्या बिलांसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली असून ती देण्यासाठी बांधकाम विभागाकडून जमवाजमव सुरू आहे.

बांधकाम विभागातील एकूण १३ बिलांवर कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या. याप्रकरणी कार्यकारी अभियंता यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकात दोन दिवसांपूर्वी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी ५ ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या गुन्ह्या संदर्भात पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. जि. प. बांधकाम विभागात ज्या बिलांवर सह्या झाल्या त्या बिला संदर्भातील सर्व कागदपत्रे पोलिसांनीजि. प.कडे मागितली आहेत. त्यामुळे जि. प. मध्ये या सर्व कागदांची जमवाजमव गुरुवारी सुरू होती. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रे पोलिसांना प्राप्त झाली नव्हती.

सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकाचे सहा.पोलीस निरीक्षक शेखर लव्हे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. बांधकाम विभागामध्ये जी बिले मंजुरीसाठी गेली होती, ती बीले ठेकेदारांच्या हाती कशी सापडली? हा प्रश्न विचारला जात आहे. बांधकाम विभागातील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या सहकार्याशिवाय असा प्रकार घडलेला नाही,अशी शक्यता पोलिसांना वाटते. त्याशिवाय त्या बिलांवर शिक्के कोणी उपलब्ध करून दिले, कार्यकारी अभियंता यांच्या संगणकावरूनच ही बिले वित्त विभागाकडे गेली होती,याचा अर्थ संगणकातील कार्यकारी अभियंता यांचा आयडी कोणी वापरला? याचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT