Sindhudurg Accident News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : बांदा–पानवळ मार्गावर एसटी बसला अपघात

सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

बांदा : बांदा–पानवळ मार्गावर सोमवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात होऊन बस रस्त्यालगतच्या झाडीत घुसल्याची घटना घडली. समोरून येणाऱ्या अवजड कंटेनरला जागा देताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून मोठी दुर्घटना टळली.

बांदा–पानवळ मार्गावरील अरुंद रस्त्यावरून एसटी बस प्रवाशांना घेऊन जात असताना समोरून एक मोठा कंटेनर येत होता. रस्ता कमी रुंदीचा असल्याने कंटेनरला मार्ग देण्यासाठी चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र, त्यावेळी बसवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट रस्त्यालगतच्या झाडीत घुसली. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बसचे नुकसान झाले असले तरी बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, मोठी जीवितहानी टळल्याने प्रवासी व स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. रस्त्याची अरुंद रुंदी आणि अवजड वाहनांची वाढती वर्दळ यामुळे या मार्गावर अपघातांचा धोका वाढत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT