१५ फुटी अजगराने गिळले कुत्रा अन्‌ चार पिल्ले  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : १५ फुटी अजगराने गिळले कुत्रा अन्‌ चार पिल्ले

दोडामार्ग-मोर्लेतील घटना; वन विभागाकडून अजगराचे सुरक्षित रेस्क्यू

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : मोर्ले येथील पंकज गवस यांच्या मांगरात आलेल्या १५ फूट लांब अजगराने एक कुत्रा आणि ४ पिल्ले गिळंकृत केली. त्यानंतर आरामात निपचित पडलेल्या या अजगराचे वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

मोर्ले येथील पंकज गवस यांच्या मांगरात एक कुत्रा आणि त्याची ४ पिल्ले बसायची. गुरुवारी दुपारी पंकज गवस यांनी नेहमीप्रमाणे कुत्र्यांना जेवणासाठी बोलावले. मात्र, ती न आल्याने पंकज गवस यांनी त्यांचा शोध घेतला. ती कोठेच आढळून आली नाही. दरम्यान, त्यांनी मांगरात जाऊन पाहिले असता तेथे एक भला मोठा अजगर आरामात वेटोळे घालून बसलेला दिसून आला.

ही बाब समजताच अजगराला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता या अजगराने कुत्रा आणि त्याच्या पिल्लांना गिळल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी या अजगरला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT