११ वर्षांच्या लेकीने दिला आईच्या चितेला अग्नी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ‘तन्वी, तुझ्या धैर्याला सलाम!’

११ वर्षांच्या लेकीने दिला आईच्या चितेला अग्नी, तळेरे-वाघाचीवाडीत हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : तन्वी, तुझ्या या धैर्याला सलामच... आईच्या शेवटच्या इच्छेखातर, लेकीने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथिल ११ वर्षांची चिमुरडी तन्वी संदीप चव्हाण हिने दाखविले. तिने आपल्या आईच्या प्रेताला अग्नी देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत मुलांप्रमाणेच मुलींनेही आपले कर्तव्या बजावल्याने तिच्या धाडसाला सलाम होत आहे.

मागील ३-४ वर्षांपासून तन्वीची आई सौ. प्रियांका ही आजारी होती. अशावेळी ती आईला हिंमत देत आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती. वडील संदीप चव्हाण हे तळेरे येथे काम करून संसाराचा गाढा हाकातात. यामुळे घरात तन्वीचा मोठा आधार आईला होता. तन्वी ही तळेरेतील वामनराम महाडीक माध्यमिक विद्यालयात इ.५ वीच्या वर्गात शिकत आहे. तिचे वय हे खेळायचे व अभ्यास करायचे असताना ती या वयात आईची सावली बनून सेवा करत होती.

जेवण बनवाने, घरचे आवरून शाळेत जाणे ही नेहमीची कामे करताना ती अभ्यासही प्रामाणिकपणे करायची. सोमवारी तिच्या आईचे निधन झाले. आजारपणात तन्वी हिने केलेली आईची सेवा व तिचा आईशी असलेला लळा विचारात घेऊन आईला अग्नी देण्याचा मान कुटुंबीयांनी तन्वी हिला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT