Sindhudurg Nuclear Power Plant 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Nuclear Power Plant : ‘अणुऊर्जा प्रकल्प नकोच’

मिठमुंबरी ग्रामसभेचा एकमुखी ठराव

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी ग्रामपंचायतीने प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एकमुखी भूमिका घेत ठाम विरोधाचा ठराव मंजूर केला. ग्रामस्थांच्या भावना, पर्यावरणाचे संवर्धन आणि स्थानिकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून शासनापर्यंत जनभावना पोहोचविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची प्रत उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, प्रांताधिकारी, कणकवली तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे सादर करण्यात आली. अणुऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण, शेती, बागायती, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य, सरपंच बाळकृष्ण गावकर, उपसरपंच गुरुनाथ गावकर, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठमुंबरी ग्रामपंचायतीचा हा ठराव केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून स्थानिक जनभावनेचा अधिकृत आवाज असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत गावाचा एकमुखी विरोध शासनापर्यंत पोहोचवून स्थानिकांच्या भावना आणि मागण्यांची दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT