कणकवली : सोशल मीडियावर ओळखीनंतर युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याच्या गुन्ह्यात किशोर प्रकाश बंदरकर (२८, रा. तिथवली, ता. वैभववाडी ) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सोमवारी रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संशयीत किशोर आणि पीडित युवतीची इन्स्टाग्रामवर फेब्रुवारी २०२६ मध्ये ओळख झाली. त्यानंतर चॅटिंग दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. किशोर याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. पीडित युवती ही मुंबईत खाजगी नोकरी करते. एप्रिल २०२६ मध्ये पीडित युवती आपल्या गावी आली होती. दरम्यान १० एप्रिल रोजी किशोर याने पीडित युवतीला कणकवली शहरानजीकच्या एका लॉजमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर किशोरला पीडितेने लग्नाबाबत विचारले असता किशोरने लग्नास नकार दिला. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिला म्हणून पीडितेने किशोर बंदरकर विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास महिला पीएसआय वृषाली बर्गे करत आहेत.