मोहन दहीकर piudhari photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकपदी मोहन दहीकर

Sindhudurg SP: सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली

पुढारी वृत्तसेवा

ओरोस ः सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे अधीक्षकपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून ठाणे शहर पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले मोहन दहीकर यांची नियुक्ती झाली आहे.

गेली अडीच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून सौरभ अग्रवाल यांनी उत्तम प्रकारे काम बजावले. आपल्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी विविध उपक्रम राबविले. शिवाय जिल्ह्यातील पोलिस भरती व अन्य विविध उपक्रमांमध्ये त्यांनी चांगले काम केले. जिल्ह्यातील अनेक गुन्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT