तहसीलदार पाटील व पोलिस निरीक्षक सोनवलकर यांच्याकडून लिंबू-पाणी घेऊन उपोषण सोडतांना नीलम पांचाळ व आरती सुर्वे. (छाया: मारुती कांबळे) 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Nerle Village Strike | नेर्ले गावातील महिलांचे उपोषण अखेर मागे

तहसीलदार व पोलिस निरीक्षकांची यशस्वी शिष्टाई

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : नेर्ले येथील महिलांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी सायंकाळी अखेर मागे घेण्यात आले. तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी त्यांची समजूत उपोषणकर्त्यांनी काढल्यानंतर लिंबू-पाणी घेऊन उपोषण सोडले.

नेलें येथील श्री देव धावजी देवस्थानच्या होळी उत्सवादरम्यान लागू करण्यात आलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत नीलम नवनाथ पांचाळ व आरती भालचंद्र सुर्वे यांनी सोमवारी सकाळपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. सोमवारी तहसीलदार पाटील व पोलिस निरीक्षक सोनवलकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला होता.

दरम्यान मंगळवारी दिवसभर उपोषण सुरूच होते. प्रशासनाकडून सातत्याने चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर सायंकाळी पुन्हा चर्चा झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपला निर्णय बदलत उपोषण मागे घेतले. उबाठा सेनेचे नंदू शिंदे, नायब तहसीलदार दिलीप पाटील, श्री. निकम, श्री. सुतार, पुरवठा निरीक्षक श्री. दांडगे, सुरेश पांचाळ, ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT