नाधवडे : वनराई बंधारा बांधताना श्रमदान करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, अधिकारी व पदाधिकारी. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : नाधवडे येथे लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांना बळ

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांचे श्रमदान

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सुरू वनराई बंधारा अभियानात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी वैभववाडी तालुक्यातील व्हेळकरवाडी-नाधवडे येथे प्रत्यक्ष सहभागी होत श्रमदान केले.      

लोकसहभागातून पाणी अडविणे, जमिनीत पाणी जिरविणे आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी सुरू या उपक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहन मिळाले. पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक उपयोग करून घेणे, वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत संचय करणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, या उद्देशाने जिल्ह्यात वनराई बंधारा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागातून विविध ठिकाणी बंधारे उभारले जात आहेत. जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून लोकसहभागातून गावपातळीवर उभी राहणारी चळवळ आहे. या दृष्टीने प्रत्येक गावाने स्थानिक परिस्थितीनुसार जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

यावेळी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे व श्रावणी रावराणे, पं. स.सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, पं. स. सदस्य साधना नकाशे व देवानंद पालंडे, सहा. गटविकास अधिकारी स्नेहा माने, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, सरपंच लीना पांचाळ, ग्रामसेवक श्री. गोसावी आणि तलाठी केदारी बागल उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT