महावितरण  Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सिंधुदुर्गात महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण

३९४ वीजवाहिन्यांच्या गाळ्यांना गार्डिंग : १८ किमी. जीर्ण वीजतारा बदलल्या

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : पावसाळ्यामध्ये महावितरणतर्फे ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, मार्गदर्शक सूचनेनुसार वीज पुरवठ्यातील बिघाड कमीतकमी होईल, या दृष्टीने नियोजन करून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. महावितरणकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राधान्यक्रमानुसार वीज वाहिन्यांची व वीज उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.

यामध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, स्टे वायरमध्ये स्टे इन्सुलेटर तपासणे व दुरुस्त करणे, वाहिन्यांचे जळालेले वा खराब जंपर बदली करणे, वाकलेले,गंजलेले पोल बदणे, सैल तारा ओढणे, लघुदाब वाहिनीवर पीव्हीसी स्पेसर्स बसविणे, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांना गार्डिंग पुरविणे, रस्त्यालगत व रस्ता क्रॉस करणाऱ्या वाहिन्यांच्या गार्डींगची तपासणी करणे, उच्चदाब व लघुदाब खांबाचे अर्थिंग तपासणे, वितरण रोहित्रां अर्थिंग तपासणे आणि तुटलेल्या अर्थवायर पूर्ववत करणे, रोहित्र वितरण पेटींची जळालेली केबल बदली करणे, रोहित्र वितरण पेटीस अर्थिंग करणे, रोहित्राच्या तेलाची गळतीची तपासणी करणे, रोहित्र व वाहिन्यांचे खराब लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, लघुदाब वितरण पेटीची दुरुस्ती करणे, भूमीगत वीज वाहिन्यांचे तात्पुरते जॉइंट कायमस्वरुपी करणे, उच्चदाब व लघुदाब फीडर पीलरचे पुर्ण अर्थिंग तपासणे तसेच आवश्यक दुरुस्ती करणे, जळालेल्या वा तुटलेल्या सर्व्हिस वायर बदली करणे.

नादुरुस्त उच्चदाब वाहिनी दुरुस्त व बदली करणे, निकामी वा तुटलेले वीज खांब बदली करणे, उपकेंद्रांची अर्थिंग तपासणी करणे, उपकेंद्रांमधील वाढलेले गवत काढणे व स्वच्छता करणे, उपकेंद्रांतील लाइटिंग अरेस्टरची तपासणी करणे व नादुरुस्त असल्यास नवीन लावणे. उपकेंद्रांतील बॅटरींची स्थिती तपासणे व मेंटेनन्स करणे, उपकेंद्रातील आयसोलेटर अलाइनमेंट दुरुस्त करणे, पीलरचे अर्थिंग दुरुस्ती करणे, जळालेल्या वा तुटलेल्या केबल बदली वा दुरुस्ती करणे, परिस्थितीनुसार आवश्यक असलेली इतर कामे सर्व वाहिन्यांचे तसेच उपकेंद्रांचे, रोहित्रांचे मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.

आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सामुग्री आणि उपकरणांचा साठा जसे की, रोहित्र ऑईल, वीज खांब, इन्सुलेटर इ. उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरु राहण्याकरीता क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्ष राहणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ७८७५७६५०१९ हा असून नागरिक व वीजग्राहक आपातकालीन स्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊ शकतात. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२ वा १८००-२१२-३४३५ वा १८००-२३३-३४३५ या २४ तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे महावितरण कळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT