तेरेखोल नदीपात्रात मायलेकांनी एकत्र उडी घेत संपविले जीवन  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime| तेरेखोल नदीपात्रात मायलेकांनी एकत्र उडी घेत संपविले जीवन

सातार्डा परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सातार्डा रायाचेपेड येथील वृद्ध आई व मुलाने तेरेखोल नदीपात्रात एकत्र उडी घेत जीवन संपविले. शनिवारी रात्री १२ वा सुमारास ही घटना घडली. रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळी नदीपात्राच्या काठावर या दोघांचे चप्पल व बॅटरी आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.

श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय-६३) आणि तुकाराम उर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय-२७) अशी मायलेकाची नावे आहेत. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने या दोघांचे मृतदेह रविवारी सायंकाळी ४ वा. बाहेर काढण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगा सुहास याने ऑनलाईन गेमिंगकरिता मोबाईलवर कर्ज घेतले होते ते कर्ज वाढल्याने त्या तणावातून मायलेकांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे सातार्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT