cctv  file photo
सिंधुदुर्ग

CCTV Cameras in All Sindhudurg Markets | सर्व बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही बसविणार

जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसवून ते कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरात जागोजागी कचराकुंड्या उभारण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल जिल्हा व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांचे आभार मानले.

महासंघाचे कार्यवाह राजू जठार, माजी अध्यक्ष द्वारकानाथ घूर्ये, सहकार्यवाह राजन नाईक, उपाध्यक्ष अवधुत शिरसाट, पुंडलिक दळवी, कुडाळ तालुका अध्यक्ष पी. डी. शिरसाट, सावंतवाडी तालुका अध्यक्ष जगदीश मांजरेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, प्रकाश वाळके, हर्षल बांदेकर, राजेंद्र पिसे आदी उपस्थित होते.

यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत पदाधिकाऱ्यांनी ना. राणे यांच्याशी चर्चा केली. व्यापारी महासंघाच्या कार्यालयासाठी भूखंड देण्याचे त्यांनी आश्वासित केले. परप्रांतीय व्यापारी रोखण्यासाठी फिरत्या व्यापाऱ्यांना महासंघातर्फे ओळखपत्रे देण्यात यावीत, अशी सूचना राणे यांनी पदाधिकाऱ्यांना केली. दर तीन महित्यांनी महासंघ कार्यकारिणी सोबत बैठकीचे आश्वासन ना. राणे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT