सिंधुदुर्ग

Sindhudurg Politics : कुडाळ तालुक्यात ठाकरे शिवसेना-काँग्रेसची आघाडी

काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस महाविकास आघाडीने उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवत राजकीय रंगत वाढवली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर बुधवारी सायंकाळी अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी सर्व इच्छुक उमेदवारांनी कुडाळ तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज यशस्वीपणे दाखल केल्याची माहिती ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. महिलांना व स्थानिक नेतृत्वाला मोठे प्रतिनिधित्व देत महाविकास आघाडीने कुडाळ तालुक्यात निर्णायक लढतीची तयारी केल्याचे स्पष्ट झाले असून, येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार आहे.

जि. प. उमेदवार

पावशी गटातून अमरसेन पुष्पसेन सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. या बरोबरच आंब्रड- सेजल शेखर परब, वेताळ बांबर्डे -बाजीराव बच्चाराम झेंडे, ओरोस बुद्रुक- जान्हवी जगन्नाथ सावंत, नेरूर-विजय नारायण लाड, तेंडोली-सुजाता सचिन गावडे, पिंगुळी- गंगाराम गणेश सडवेलकर, घावनळे-सखाराम चंद्रकांत खोचरे, माणगाव-रमाकांत वसंत ताम्हाणेकर

पं. स. उमेदवार

आंब्रड-दशरथ बाळाराम मेस्त्री, जांभवडे-यशपाल अशोक सावंत, वेताळ बांबर्डे-समृद्धी संतोष कदम, आवळेगाव-योगिता नंदकिशोर पवार, ओरोस बुद्रुक- महादेव परब, कसाल-संतोष शंकर कांदळकर, पावशी -चित्रा विजय पावसकर, डिगस-नारायण (आपा) सुरेंद्र मांजरेकर, नेरूर- देऊळवाडा (उत्तर)-दीप्ती प्रदीप नाईक, नेरूर देऊळवाडा (दक्षिण)-अर्चना अतुल बंगे, पाट- प्राची प्रमोद कुंभार, तेंडोली-विजय प्रभू (काँग्रेस), साळगाव-कृष्णा दत्ताराम धुरी, पिंगुळी-ममता दत्तगुरू राऊळ, घावनळे-सोनिया संतोष मुंज, गोठोस- दीक्षा दिगंबर तवटे, माणगाव-योगेश दत्ताराम धुरी, झाराप-यज्ञेश तातू गोडे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT