सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Education Officer Corruption Case : तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडणार..!

'त्या' आदेशावर शिक्षक परिषदेचा संताप : सीईओंना दिले निवेदन

पुढारी वृत्तसेवा

​कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या वर भष्ट्राचाराचे आरोप झाले. शिक्षण उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी चक्क 'क्लीन चिट' देऊन पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचे आदेश काढले आहेत. या विरोधात 'महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जि. सिंधुदुर्ग' अत्यंत आक्रमक झाली असून, जर कविता शिंपी यांना पुन्हा सिंधुदुर्गात हजर करून घेतले, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल,असा थेट आणि निर्वाणीचा इशारा  संघटनेने दिला आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई आणि त्यानंतर झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची अपेक्षा होती. यावर सर्वच शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. पण या संपूर्ण प्रकरणात शासनाच्या नविन आदेशांमुळे शिक्षकांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा आरोप आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती. या दरम्यान त्या रजेवर गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर जि.प.कडून त्यांना हजर करून घेतले नव्हते. याच पार्श्वभूमीवर शिक्षण उपसचिवांकडून हजर करून घेण्याच्या दि. १२ मे रोजी एका पत्रानुसार आदेश काढण्यात आलेले आहेत. या आदेशामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्या.या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शिक्षण उपसचिवांनी केलेले आहे. असा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेचा आरोप आहे. एका बाजूला चौकशी सुरू असताना आणि विधान परिषदेत हक्कभंगाची तक्रार दाखल झाली असताना, उपसचिवांनी  हा आदेश काढला आहे. हा निर्णय म्हणजे जिल्ह्यातील प्रामाणिक शिक्षकांच्या भावनेशी क्रूर खेळ आहे. जर हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर राज्यव्यापी जनआंदोलन छेडले जाईल.असा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT