कलंबिस्त-वेर्ले मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : कलंबिस्त-वेर्ले मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात

स्वार गंभीर; महिला व मुलगी जखमी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : कलंबिस्त-वेर्ले मार्गावर शनिवारी दुपारी २ वा. च्या सुमारास टाटा पंच कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी अमित लिंगवत, त्यांच्या पत्नी दिशा आणि मुलगी अन्वी हे वेर्ले येथून माडखोल येथे एका लग्नसमारंभासाठी कारने जात होते. दरम्यान, कलंबिस्त-वेर्ले मार्गावर समोरून येणारी मोटारसायकल अचानक त्यांच्या कारवर येऊन आदळली. यात स्वार सुमित तावडे हा अपघातात गंभीर जखमी झाला. तर दिशा लिंगवत (४०) व अन्वी लिंगवत (२) हे दोघे किरकोळ जखमी झाली. या धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT