Sindhudurg news 
सिंधुदुर्ग

Sindhudurg news: तारकर्लीत रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर छापा; दोन बोटींसह ७ कामगार ताब्यात

illegal sand mining in maharashtra latest news: उत्तर प्रदेशातील ७ कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे देखील समजते

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले: तालुक्यातील चिपी, कालवंडवाडी येथील खाडीपात्रात, तारकर्ली पुलाजवळ रविवारी (दि.२१) १२.१५ च्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू उपसा करताना दोन बोटी जप्त करण्यात आल्या असून, त्यामध्ये सुमारे ५ ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान उत्तर प्रदेश राज्यातील ७ कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची नावे वीर बहादूर संकर, विवेक बाबा, संतु बाबा, हिन्दू यादव, जितेंद्र सहा, ज्युव यादव आणि राजन बहर अशी आहेत. या सर्व कामगारांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी निवती पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या नेतृत्वाखालील या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत एपीआय भीमसेन गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी रजनीकांत नायकोडे, गौतम सुतार, नामदेव मोरे, पोलीस हवालदार कदम, पोलीस ड्रायव्हर लोणे आणि चिपी पोलीस पाटील संदेश पवार यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT