illegal liquor  pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime| ओसरगाव येथे १५ हजारांची गोवा दारू जप्त

कोल्हापूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : गोवा ते कोल्हापूर अशीे गोवा दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना महामार्ग पोलिसांनी पकडले. या कारवाईत विविध ब्रँडच्या गोवा दारूच्या बाटल्या असा एकूण १५ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

ही कारवाई गुरुवारी दुपारी१ वा. करण्यात आली. या प्रकरणी राजेंद्र मारुती जाधव (वय ४९, रा. कासारवाडा, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) आणि सुजय अशोक वारके (३२, रा. कासारवाडा, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्ग पोलिसांच्या पथकाला गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनातून गोवा दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. अधिक तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT