देवगड : देवगड-जामसंडे व कट्टा या तीन गावांची ग्रामदेवता श्री दिर्बादेवी व श्री रामेश्वराच्या त्रिपुरारी जत्राेत्सवाला मंगळवारी भाविकांनी अलाेट गर्दी केली. मंगळवारी सकाळपासून श्री दिर्बादेवी व श्री देव रामेश्वराच्या दर्शनासाठी माेठ्या संख्येने उपस्थिती लावली हाेती.
मंगळवारी पहाटेपासून श्री दिर्बादेवी व श्री रामेश्वराच्या त्रिपुरारी जत्राेत्सवाला प्रारंभ झाला. पहाटे श्री दिर्बादेवी व श्री रामेश्वर यांचा पूजाविधी, त्यानंतर देवीला विविध अलंकाराने साड्यांनी सजविणे, ओट्या भरणे तर दुपारपासून भजनांचा कार्यक्रम, मंदिरात पाेथीवाचन, व्यासपूजा, कीर्तन, देवीला पाेहे वाहणे असे कार्यक्रम पार पडले.
या जत्रेसाठी माेठ्या प्रमाणात भाविक दाखल झाल्याने सकाळपासून दर्शनासाठी ओघ हाेता. मंदीरापासून रस्ता दुतर्फा व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली हाेती. जत्राेत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण जामसंडे परिसर भक्तिमय झाला हाेता. मंदिरामध्ये सकाळपासून भजनांचे सूर आळविले जात हाेते. भाविक श्रीदिर्बादेवी माता व श्रीदेव रामेश्वर यांच्यासमाेर नतमस्तक हाेत हाेते. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक व माहेरवाशीणी माेठ्या संख्येने जत्राेत्सवाला आल्या हाेत्या. मंदिरात देवीची मनाेभावे खणा-नारळाची ओटी भरली जात हाेती. सायंकाळी जत्रेला माेठ्या प्रमाणात गर्दी हाेती. भाविकांचा दर्शनाबराेबरच जत्राेत्सवातील खरेदीतही उत्साह दिसून येत हाेता.
जत्राेत्सवात मालवणी खाजा, लहान मुलांची खेळणी, कपडे, शाेभिवंत वस्तू, उपहारगृहे अशा अनेक प्रकारच्या दुकानांनी मंदिरापासून सुमारे ५०० मीटर भाग व्यापला हाेता. लाेकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी श्रीदिर्बादेवी व श्रीरामेश्वर यांचे दर्शन घेतले. जत्राेत्सवाला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची साेय करण्यात आली हाेती.सकाळपासूनच देवीची ओटी भरण्यासाठी माेठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी हाेती. भाविकांना दर्शन सुलभतेने मिळावे यासाठी चांगले नियाेजन करण्यात आले हाेते.