सिंधुदुर्गच्या आरोग्य प्रश्नांवर मुंबईत उच्चस्तरीय बैठक  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा !

सिंधुदुर्गच्या आरोग्य प्रश्नांवर मुंबईत उच्चस्तरीय बैठक

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आरोग्य भवन, मुंबई येथे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. आ. दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणारे अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

बराच काळ लोटल्याने या हॉस्पिटलचे नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाची इमारत दोन मजली करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

रिक्त पदे १ महिन्यात भरली जाणार

जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी नसल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. याची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी येत्या महिनाभरात सर्व रिक्त पदे भरण्याचे कडक आदेश प्रशासनाला दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महात्मा फुले योजनेचा लाभ आता गोवा आणि बेळगावमध्येही सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गोवा मेडिकल कॉलेज आणि के.एल.ई. हॉस्पिटल (बेळगाव) येथील महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा तांत्रिक कारणांमुळे बंद होती. आ. केसरकर यांच्या मागणीनुसार, ही सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्री आंबिटकर यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.

वैद्यकीय पर्यटनाला चालना: पंचकर्म आणि आयुष केंद्रे

सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने येथे वैद्यकीय पर्यटनावर भर देण्यात येणार आहे. रेडी, आंबोली आणि आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पंचकर्म सुविधा केंद्र व आयुष वेलनेस क्लिनिक सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा केला होता. या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद सीईओ रविंद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी आणि कोल्हापूर परिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT