वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचा कारभार रामभरोसे !  
सिंधुदुर्ग

­Sindhudurg News : वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचा कारभार रामभरोसे !

गंभीर दखल न घेतल्यास १ मे रोजी ‘डिन हटाव, हॉस्पिटल बचाव’ जनआंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. ‘एनी डेस्क’ सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे ठेकेदारच या रुग्णालयाचा प्रशासकिय कारभार चालवत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत गंभीर दखल घेतली नाहीतर १ मे नंतर अधिष्ठातांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात ‘डीन हटाव- हॉस्पिटल बचाव’ जन आंदोलन पुकारण्याचा इशारा आहे.

सिधुदुर्गवासीयांच्या आरोग्य सेवेची यंत्रणा हाकणे अपेक्षित असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गैरकारभाराचा पाढा प्रसाद गावडें यांनी सिंधुदुर्गनगरी येेथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले पुणे, सांगली व कोल्हापूर येथील ठेकेदारच सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचा प्रशासकीय कारभार चालवत आहेत. निविदांना प्रसिद्धी देणे, मंजुरी देणे, स्वतःला पात्र ठरवून इतरांना अपात्र करणे असा ‘भ्रष्ट’ कारभार ‘एनीडेक्स सॉफ्टवेअर’ प्रणालीच्या माध्यमातून चालविला जात असल्याचा आरोप प्रसाद गावडे यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी ६२ लाखांच्या निविदाकाराला डावलून

९९ लाख रुपयांची निविदा भरणाऱ्या मर्जीतील निविदाकाची निवींदांना मंजुरी देणाऱ्या टोळीचे कारनामे आण कागदपत्रांसहित उघड केले असून, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी याकडे आतातरी डोळसपणे पाहण्याची मागणी त्यांनी केली आहे. भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य यंत्रणा अक्षरशः खिळखिळी केली असून ‘डीन’च टोळीचा प्रमुख असल्याचा सणसणाटी आरोप करत. वस्‍त्रधुलाई टेंडर, साहित्य खरेदी, आहार पुवठा, पुस्तक खरेदी अशा अनेक प्रकरणातील कारनामे ‘एनी डेस्क प्रणालीच्या माध्यमातून’ घडवले गेल्याचे उघड केले आहे.

यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व आयुक्‍त यांचेकडे रितसर तक्रारी दिल्या असून अधिष्ठाता व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या डीन विरोधात तक्रारी असून देखील त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तरं जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अशी अधोगतीस गेली नसती, डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने रुग्णांना इतरत्र रेफर करावे लागते या लाजेपोटी ‘डिस्चार्ज’ भासवायची वेळ आली नसती असेही त्यांनी म्‍हटले आहे. ढासळलेली आरोग्य यंत्रणा पाहता सर्वसामान्य जनतेच्या होणारी गैरसोय पाहता वेळप्रसंगी १ मे नंतर "डीन हटाव... हॉस्पिटल बचाव" असे नागरी जनआंदोलन पुकारणार असल्याची असल्याचा इशारा देखील त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.

यावेळी गावडे पुढे म्हणाले, मला मॅनेज करायचा प्रयत्न देखील झाला मात्र सर्व सामान्य जनतेची मूलभूत करत असलेली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा उद्ध्व‍स्त करणाऱ्या टोळी विरोधात संघर्ष चालूच राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT