गणेशोत्सव देखाव्यातून साकारली तुकाराम मुंढेंच्या कार्याची गाथा! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : गणेशोत्सव देखाव्यातून साकारली तुकाराम मुंढेंच्या कार्याची गाथा!

कासार्डे-उत्तर गावठण येथील सावंत-भोसले परिवराचा देखावा लक्षवेधी

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : कोकणात घरोघरी बाप्पा विराजमान होत असताना घरोघरी देखावे सुद्धा बनवले जातात. अशाचप्रकारचा लक्षवेधी देखावा कासार्डे-उत्तर गावठण येथील सावंत-भोसले परिवाराकडून साकारण्यात आला आहे. चित्रकार सहदेव सावंत याच्या संकल्पनेतून कडक शिस्तीच्या आणि प्रामाणिक व बेधडक प्रशासकीय कामकाजामुळे नेहमीच चर्चेत असणारे तुकाराम मुंढेंचा प्रामाणिकपणा देखाव्यात दाखवले आहे.

कोकणातील गणेशोत्सव जगाला हेवा वाटावा असा साजरा केला जातो. यातच घरोघरी गणेशोत्सवाची धामधूम असल्याने सजावटीची चढाओढ दिसून येते. काही घरातून पारंपरिक सजावट आजही दिसून येत गणेशोत्सव साजरा करण्याबरोबर सामाजिक बांधिलकीसह एकोप्याने दर्शन घडवून सजावटीतून संदेश देण्याचे कामही केले जाते. असाच देखावा कासार्डे -उत्तर गावठण येथील मुंबईस्थित चित्रकार सहदेव सावंत यांनी साकारला आहे.

महाराष्ट्राच्या अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत व कडक शिस्तीच्या आणि प्रामाणिक प्रशासकीय कामकाजामुळे नेहमीच चर्चेत असणारे IAS अधिकारी तुकाराम हरिभाऊ मुंढे याच्या जीवनावर आधारित देखावा साकारला. त्याच्या सोबत खास आकर्षण पंढरीची वारीसह तुकाराम महाराजांचे ४०० वर्षांचा प्रवास दाखवून महाराष्ट्राचे लाडके अधिकारी तुकाराम मुंडे याचे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व लाभले असून त्याच्याप्रमाणे सर्वच शासनाच्या असे अधिकारी हवेत, असे सावंत परिवारातर्फे विठ्ठल आणि गणरायाला सांगणे आहे. तुकाराम मुंडे याची बदली दुसऱ्या खात्यात होऊ नये, अशी प्रार्थना गणराया चरणी केली आहे. त्याच्या या देखाव्याला पसंती मिळत कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT