सावंतवाडी पोलिसांनी पकडलेल्या दारूचा मुद्देमाल व संशयित यांच्यासह पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलिस हर्षद हिंगे, धोत्रे, नीलेश नाईक. (छाया : नागेश पाटील) 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : गोवा दारू वाहतूकप्रकरणी चौघांवर गुन्हा

दोघांना अटक, तर दोघे फरार; दारूची ‘ती’ वाहतूक आंध्र प्रदेशमधील निवडणुकांसाठी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सातार्डा पोलिस चेक पोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी पकडलेला दारूने भरलेला आयशर कँटर हा आंध्र प्रदेश येथे नेण्यात येत होता. आंध्र प्रदेश राज्यात निवडणुका असल्याने त्याकरिता ही दारू वाहतूक केली जात होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात भास्कर प्रदीप रामाराव त्रिमलशेट्टी, व्यंकटनागरान गोपाळकृष्ण बालम व बॉबी पडाला (तिघेही रा. आंध्र प्रदेश) व निरंजन आनंद नाईक (रा. ओरोस) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी भास्कर त्रिमलशेट्टी व व्यंकटनागरान बालम या दोघांना बुधवारी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली. तर अन्य दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

सावंतवाडी पोलिसांनी सातार्डा पोलिस चेक पोस्ट येथे मंगळवारी या आयशर कँटरवर कारवाई करत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा बेकायदा गोवा दारूचा मुद्देमाल पकडला होता. कँटरमधून पुठ्ठेच्या आडून गोवा दारू भरून ती आंध्र प्रदेश राज्यात वाहतूक केली जात होती. वाहतूक केली जाणारी गोवा दारू ही तेथील निवडणूक लागल्याने नेण्यात येत होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. याबाबत अधिक तपास सहा पोलिस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT