मारहाण Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : किल्ले सिंधुदुर्गवर पर्यटकांची गाईडला मारहाण

पोलिसांकडून पर्यटक ताब्यात : स्थानिकांनीही घेतली 'हजेरी'

पुढारी वृत्तसेवा

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात धिंगाणा घालणाऱ्या युवकांना समज दिल्याच्या रागातून स्थानिक पर्यटक गाईडला मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिस किल्ले सिंधुदुर्ग येथे पोहोचले, आणि त्यांनी पर्यटकांना ताब्यात घेऊन मालवण पोलिस ठाण्यात आणले.

किल्ले शिवराजेश्वर मंदिरात पर्यटक ग्रुपला माहिती देत असतांना सात ते आठ युवकांचा एक ग्रुप धागडधिंगाणा घालत होते. शिवराजेश्वर मंदिरातच हा प्रकार होत असल्याने पर्यटक गाईड यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पर्यटकांनी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना पर्यटकांकडून गाईडला मारहाण करण्यात आली.

स्थानिक युवकाला मारहाण होत असल्याचे पाहून किल्ले रहिवासी आणि इतर पर्यटकांनी गाईडला बाजूला करत पर्यटकांची चांगलीच हजेरी घेतली. दरम्यान, यातील काही पर्यटकांनी पळ काढला. तर दोघे पर्यटक स्थानिकांच्या ताब्यात मिळाले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी पोलिस अधिकाऱ्यांना किल्ले सिंधुदुर्गवर पाठवून हुल्लडबाज पर्यटकांना पोलिस ठाण्यात आणले होते.

स्थानिक पर्यटन गाईडला मारहाण करणारे काही पर्यटक पळून गेले होते. तर त्यापैकी दोन पर्यटक सापडले. यामुळे सर्व पर्यटकांना एकत्रित करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम राबविली. तसेच किल्ले सिंधुदुर्ग येथून दोघांना बोटीच्या साहाय्याने पोलिसांनी मालवणात आणले होते. किल्ले पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी मारहाणीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT