Sindhudurg Temples Reopened 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Temples Reopened | जिल्ह्यातील ५ मंदिरे पूर्ववत सुरू करण्यात यश

Sindhudurg | जिल्ह्यातील ५ मंदिरे पूर्ववत सुरू करण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : अनेक वर्षापासून अंतर्गत मतभेद, मानकऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मंदिरे बंद आहेत. गेले वर्षभरात २५ हून अधिक मंदिरांशी संबंधित गावकरी व मानकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यातील ५ मंदिरांमधील मानकरांच्या समन्वयातून मंदिरे सुरू करण्यात यश आले आहे. यात घारपी, उगाडे, माडखोल, ओसरगाव, पडवे येथील मंदिरांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदू रक्षणाची ही संघटन शक्ती जिल्ह्यात अधिक प्रेरणादायी ठरव ण्यासाठी गावातील नागरिकांनी आणि मानकऱ्यांनी आपली मंदिरे आणि धार्मिक सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. जोशी यांनी यावेळी केले. सिंधुदुर्गनगरी येथे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे शरद राऊळ यशवंत परब, हिंदू जनजागरण समितीचे राजेंद्र पाटील, मंदिरांचे मानकरी घनश्याम राणे, ओसरगाव गोविंद गावडे, दीपक गावडे, विलास गावडे, घारपी दत्ताराम राऊळ, माडखोल ग्राम पुरोहित जनार्दन भागवत, कुणकेरीचे सुनील राऊळ, मंदीर महासंघाचे जीवन केसरकर आदीं उपस्थित होते.

संजय जोशी, सत्यवान कदम, यशवंत परब, शिवराम गावडे, गोविंद परब आदीसह मंदिरांच्या मानकऱ्यांनी आपले मंदि बंद असलेल्या कालावधीचे अनुभव कथन केले. आज मानकरांमधील अंतर्गत वाद काहीसे मिटविण्यात यश आल्याचे आणि वार्षिक कार्यक्रम सुरू झाल्यामुळे गावात एकोपा निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. यात धारपी येथील ग्रामदेवता मंदिर मतभेदांमुळे गेली दोन दशके पूर्णपणे बंद होते. यात दोन्ही बाजूंच्या मानकरांची समन्वय साधला. आता हे मंदिर पूर्ववत सुरू झाले असून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असल्याचे श्री. जोशी यांनी स्पष्ट केले.

संजय कदम म्हणाले, जिल्ह्यातील आणि राज्यातील मंदिरांच्या रक्षणासाठी मंदिर महासंघाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०० शेहून अधिक मंदिरे आहेत. त्यातील सुमारे १०० मंदिरामध्ये अंतर्गत मानपाण्यावरून वादविवाद आहेत. गेल्या वर्षभरात २५ मंदिरांशी संपर्क साधून त्यातील १० मंदिरे मानपानाच्या वादापासून मुक्त करण्वात तर पाच मंदिरातील पूर्ण मानपान बाजूला ठेवून वार्षिक कार्यक्रम सुरू करण्यात आणि हिंदू रक्षणाची एकजूट राखण्यात यश आले आहे. आज या गावातील सर्व मानकरी एकोप्याने मंदिरांच्या वार्षिक कार्यक्रमाला सुरुवात करत जत्रोत्सव व अन्य कार्यक्रम सुरु केले आहेत.

तरुणांचा पुढाकार कौतुकास्पद

यातील काही गावांमध्ये तरुणांनी तुमचे मानपान बाजूला ठेवा, आम्हाला आमच्या गावाच्या मंदिरांची एकजूट आणि कार्यक्रम सुरू असणे हिताचे आहे. त्या दृष्टीने अनेक उत्सव कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले आहेत. जिल्ह्यातील अशा बंद असलेल्या मंदिरांच्या मानकऱ्यांनी नागरिकांनी एकजुटीने हिंदू रक्षणासाठी आपल्या बंद असलेल्या मंदिरांची पुनर्रचना व वार्षिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी संघटित व्हावे हेच आपल्या हिंदू रक्षणाचे महत्त्वाचे आध्यात्मिक हानी रोखण्यासाठी व संघटक शक्ती जिल्ह्याला प्रेरणादायी महत्त्वाचे ठरणार असल्याचे श्री. जोशी म्हणाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT