देवगडच्या पहिल्या पाच डझनच्या आंबा पेटीला तब्बल ३१ हजाराची किंमत लिलाव पद्धतीने मिळाली. 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : बाजारात फळांचा राजा दाखल; पहिल्या पेटीला ३१ हजार रुपये दर

पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये लिलाव

पुढारी वृत्तसेवा

देवगड : पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये देवगडच्या पहिल्या पाच डझनच्या आंबा पेटीला तब्बल ३१ हजाराची किंमत लिलाव पद्धतीने मिळाली आहे. केशर जातीची ही आंबा पेटी देवगड येथील आंबा बागायतदार साद मुल्ला यांनी आपल्या बागेतील केसर जातीच्या आंब्याची पहिली पेटी प्रणित मांजरेकर यांच्या साई आंबा सर्व्हिसने पुणे मार्केट यार्ड येथील आंबा व्यापारी मे. नामदेव रामचंद्र भोसले यांच्याकडे विक्रीसाठी पाठविली होती.

हापूस आंब्याला फळाचा राजा मानले जाते. त्यामुळे देवगडहून पुणे मार्केट यार्डमध्ये उपलब्ध झालेल्या पहिल्या मानाच्या आंबा पेटीच्या खरेदीसाठी झालेला लिलाव प्रक्रियेत ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आंबा पेटीचे तेथील उद्योजक बाबासाहेब मिसाळ यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर या आंबा पेटीची लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही मानाची आंबा पेटी खरेदी करण्याचा मान तेथील रावसाहेब दिनकर कुंजीर यांनी मिळविला. त्यांनी ही पेटी तब्बल ३१ हजाराला खरेदी केली.

कोकणात केसर जातीच्या आंबा फळाच्या कलमांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे मार्केट यार्डला पहिली पेटी केसर जातीच्या आंबा फळाची आली, असे तेथील आंबा विक्रेते अनिरुद्ध भोसले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT