पीक नुकसान भरपाई  File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : १,७४३ आंबा-काजू बागायतदारांना दिलासा, खात्यात तीन कोटी ९४ लाखांची नुकसानभरपाई जमा

आतापर्यंत २८ हजार शेतकऱ्यांना ६३ कोटींची मिळाली भरपाई

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. २८ सप्टेंबरअखेरीस आणखी एक हजार ७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यात ३ कोटी ९४ लाख ८ हजार २५१ रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत नुकसानभरपाई मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ३५५ झाली आहे.

जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी एकूण ३४ हजार ९१२ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ७६ कोटी ३८ हजार ७८० रुपये निधीला पोर्टलद्वारे मान्यता दिली आहे. पैकी यापूर्वी २६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५९ कोटी २३ लाख ४५ हजार ९४५ रुपये नुकसानभरपाई जमा झाली होती. त्यानंतर आता एक हजार ७४३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ कोटी ९४ लाख ८ हजार २५१ रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण २८ हजार ३५५ शेतकऱ्यांना ६३ कोटी १७ लाख ५४ हजार १९६ रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे.

उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रियाही सुरू आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार दोन हजार ४१७ लाभार्थी शेतकऱ्यांची ३ कोटी ८६ लाख रुपये रक्कम पेमेंटसाठी प्रलंबित आहे. तसेच एक हजार ५६२ लाभार्थी शेतकऱ्यांचे ३ कोटी ७६ लाख रुपये पेमेंट रिजेक्ट झाले असून, संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. तर दोन हजार ५७८ लाभार्थी शेतकऱ्यांची ५ कोटी १९ रुपये रक्कम ई-केवायसी प्रलंबित असल्याने वितरित झालेली नाही.

नुकसानभरपाईची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे तसेच बँक खाते व आधार संलग्नतेबाबत आवश्यक पूर्तता करणे गरजेचे आहे. प्रलंबित लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय अथवा नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रामार्फत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT