गावठी बॉम्ब स्फोटात जखमी शेतकऱ्याचा मृत्यू Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : गावठी बॉम्ब स्फोटात जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

मुळदे तळपवाडीतील दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील संतोष महादेव मासंग (50) या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बांबोळी-गोवा येथे उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

संतोष मासंग हे आपल्या घराशेजारील बंद पडलेल्या पोल्ट्री वजा मांडवात गावठी बॉम्ब तयार करत असताना शुक्रवारी सायंकाळी अचानक स्फोट झाला. या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कुडाळ पोलिस स्थानकातून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT