सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार ३२३ शाळांमध्ये होणार प्रवेशोत्सव 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : शाळेचा पहिला दिवस!

जिल्ह्यातील १ हजार ३२३ शाळांमध्ये होणार प्रवेशोत्सव

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : सोमवार (१५ जून) पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून या निमित्त होणाऱ्या ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जि. प. च्या १ हजार ३२३ शाळांपैकी ३०९ शाळांमध्ये संबंधित विभागातील लोकप्रतिनिधी तसेच वर्ग-१ व वर्ग-२ चे शासकीय अधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शाळांच्या सोयी-सुविधा, पटसंख्या, ग्रामीण विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेकडे कल वाढविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या या भेटी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे, समाज, पालक यांचा शिक्षणाचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, बालकांनी आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे, तसेच सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, यासाठी हा ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहून दाखल विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मोफत बूट व पायमोजे वाटप करावेत, शाळांमधील कामकाजाचा, शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घ्यावा, मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करावे, अशा प्रकारचे निर्देश आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT