बळीराजाचे डोळे आभाळाकडे File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : बळीराजाचे डोळे पावसाकडे!

पाण्याअभावी भात रोपे वाळून जाण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा

मळगाव : यावर्षी बदललेल्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गणेशोत्सवात पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र शेतकरी पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे. यावर्षी भात शेतीचे प्रमाण कमी आहे. दरम्यान भातपिक योग्य प्रकारे पोसण्यासाठी पावसाची आणखीन गरज असल्याने पाऊस होणे गरजेचे आहे.

यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या आंबा-काजू उत्पादनामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानाचा सामना करीतही थोड्याफार प्रमाणात भातशेती केली आहे. आता भातरोपे प्रसवण्याच्या अवस्थेत असून यासाठी भात खाचरांमध्ये पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. मात्र पावसा अभावी भात खाचरे कोरडी पडली असून यासाठी पाऊस होणे आवश्यक आहे. अन्यथा भातरोपे प्रसवण्यापूर्वीच ती वाळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुळात मजुरीचे व खतांच वाढलेले दर, पशुपालनात झालेली घट, वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. येथील युवा वर्ग नोकरीसाठी गोवा मुंबई, पुणे, गोवाकडे स्थायिक होत असल्याने गावोगावी शेती पडीक रहात आहे. आता वेळीच पाऊस न झाल्यास भातशेती पूर्णपणे धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी राजा पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT