Water Supply Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Water Scarcity | कोकणात पाणीबाणी! मालवण आणि कणकवली तालुक्यात सर्वाधिक टंचाई; विहिरींच्या गाळ काढण्यावर भर

Sindhudurg Water Scarcity | 8 कोटी 39 लाख 90 हजारचा आराखडा मंजूर : सर्वाधिक टंचाई वाड्या मालवण व कणकवली तालुक्यात

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिनाभरात उष्णतेचे प्रमाण वाढत असून पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. टंचाईमुक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या टप्पात एक गाव ३२२ वाड्यांवर पाणीटंचाईचा ८ कोटी एकूण ३९ लाख ९० हजाराचा आराखडा मंजूर करण्यात आला असून सर्वाधिक टंचाईग्रस्त वाड्या मालवण आणि कणकवली तालुक्यात आहेत सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या अनेक वर्षापासून टँकरमुक्त जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे.

या टँकरमुक्त जिल्ह्यात काही वाड्यांवर दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. परंतु संभाव्य उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत यावर कटाक्षाने लक्ष देऊन सार्वजनिक विहीर, तात्पुरती पूरक योजना, विहिरींचे गाळ काढणे, नळपाणी योजनांची विशेष दुरुस्ती आदी कामे घेण्यात येतात. यावर्षीही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ३२२ वाड्यांवर पाणीटंचाईचा ८ कोटी ३९ लाख ९० हजार आराखडा तयार करण्यात आला आहे.

यामध्ये मालवण तालुक्यातील ७वाड्यांची विधन विहीर दुरुस्ती, ४१ वाड्यांवर नव्याने विधनविहीर खोदणे, १९ विहिरींचा गाळ काढणे, ६७ वाड्यांसाठी ५२ लाख २५ हजार देवगड तालुक्यातील १ गाव ३२ वाड्यांमध्ये ७ विंधन विहीर दुरुस्ती, २३ नवीन विधनविहार खोदणे २ विहीरीचागाळ काढणे आदी कामांसाठी २५लाख ३० हजार रुपये, कणकवली तालुक्यातील ६३ वाड्यामध्ये नवीन विंधनवीहिर खोदणे ३५, विहीर खोल करणे गाळ काढणे २८ आदींसह कामांसाठी ५३ लाख ६० हजार, वैभववाडी तालुक्यातील विधन विहीर विशेष दुरुस्ती, ९न बीन विधन विहीर २४ नवीन विधन विहीर खोदणेआधी कामांसाठी ३३ लाख ३० हजार, कुडाळ तालुक्यातील १५ वाड्यांमध्ये १८ नवीन विंधन विहीर खोदण्यासाठी १८ लाख रुपये,

सावंतवाडी तालुक्यातील १८ वाड्यांसाठी ४ विंधन विहीर दुरुस्ती १२नवीन आणि २ विहिरींचा गाळ काढणे आधी कामांसाठी १९ लाख १० हजार, वेंगुर्ले तालुक्यातील ११वाड्यांमध्ये १ विंधन विहीर दुरुस्ती, नव्याने विधनविहार खोदणे, १ विहिरीतील गाळ काढणे आदी कामांसाठी ११ लाख ५० हजार, दोडामार्ग तालुक्यातील ३ वाड्यांमध्ये २ नवीन खोदणे १ विहिरीचा गाळ काढणे आधी कामांसाठी ४ लाख ५० हजार अशा जिल्ह्यातील २८ बिंधन विहिरींची दुरुस्ती करणे १६१ वाड्यांवर नव्याने विधन विहीर खोदणे

५३ वाड्यांच्या विहिरीमधील गाळ काढून खोलीकरण वाढविणे आधी ३२२ वाड्या आणि देवगड तालुक्यातील एका गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती असल्यामुळे ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने २ गाव ३२२ वाड्यांचा पाणीटंचाई निवारण कार्यक्रम तयार केला आहे.

या टंचाई आरखड्याला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली असून संभाव्य आराखड्यातील कामांना सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी वाढते उष्णतेचे प्रमाण आणि पाण्याची पातळी खालवण्याची परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे, परंतु बंधारे बांधणे आणि तलाव, धरणे उभारणी आदी कामांमुळे पाण्याची पातळी समप्रमाणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गावागावात जलजीवन मिशन भारत निर्माण राष्ट्रीय पेयजल यासारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पाणी योजना राबविण्यात आल्यामुळे त्यांचाही निवारण कार्यक्रमासाठी गेल्या दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या आराखड्यामध्ये कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. संभाव्य टंचाई आराखड्यानुसार या वाड्यांवर विधन विहीर खोदणे, गाळ काढणे, विहिरींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT