देवगडच्या पाणी प्रश्नावरून राजकारण तापले 
सिंधुदुर्ग

Devgad Water Crisis : देवगडच्या पाणी प्रश्नावरून राजकारण तापले

पुरावे द्या, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, हर्षा ठाकूर यांच्या आरोपावर पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

देवगड ः कोर्ले-सातंडी आणि दहिबाव नळपाणी योजनेवरून उबाठा गटाच्या हर्षा ठाकूर यांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि राजकीय आकसापोटी केलेले आहेत. त्यांनी येत्या 15 दिवसांत भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे, हर्षा ठाकूर यांनी माझ्यावर आरोप केला की, कोर्ले-सातंडी प्रस्तावित नळयोजनेची नेमण्यात आलेली झचउ टक्केवारीसाठी खासगी संस्थेची नेमणूक केली. मात्र, हर्षा ठाकूर जेव्हा नगरसेविका होत्या तेव्हा माझ्या माझे पती योगेश चांदोस्कर हे या शहराचे उपनगराध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती होते. तेव्हा त्यांनी खासगी संस्थेचा विचार न करता 28 ऑगस्ट 2017 रोजीच्या नगरपंचायत सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्र.33(02) नुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची झचउ म्हणून नेमणूक केली होती. या योजनेचे गेली सात वर्षे चार महिने काम चालू होते. पण समाधानकारक काम न झाल्याने 30 डिसेंबर 2024 रोजी ठराव क्र. 57 ने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ची झचउ रद्द करुन खासगी संस्थेला (झचउ) म्हणून नियुक्ती करणे कामी सभेत मान्यता देण्यात आली. या गोष्टीला 1 वर्ष झाले,त्यानंतर सर्व टेंडर प्रक्रिया झाली व नवीन झचउ ला वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यावेळी उबाठाचे पाच नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. पण त्यांचा विरोध नव्हता, याची माहिती हर्षा ठाकूर यांनी घेतली नाही व चुकीच्या सूत्रामार्फत माहिती घेऊन त्या माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहे.

सौ.ठाकूर यांचा दुसरा विषय दहिबाव नळपाणी योजनेसाठी मंजूर कामाच्या 9 कोटी 21 लाख रुपयांची नगरपंचायतीचा हिस्सा 10 टक्के रक्कम म्हणजे 92 लाख व कोर्ले सातंडी नवीन योजनेची 10 टक्के रक्कम कशी भरणार. यावर मी सौ.तन्वी चांदोस्कर पाणी पुरवठा सभापती म्हणून आश्वासित करते की, कुठल्याही परिस्थितीत देवगड -जामसंडेवासियांवर कुठलाही आर्थिक भुर्दंड ठेवणार नाही.

पाडाघर योजनेचे पाणी एक ठरावामुळे बंद झाले आहे. पण हर्षा ठाकूर यांना सांगू इच्छिते की, 12 जुलै 2018 रोजी जेव्हा ठराव झाला त्यावेळी तुम्हीसुध्दा नगरसेविका होता. नगरपंचायतीला 63 टक्के पाणी मागणीच्या आधारे रु.2 कोटी 12 लाख एवढी भांडवली हिस्सा देण्यासंदर्भात सभागृहाला माहिती दिली. त्यावेळी पूर्ण सभागृहाने 22 रु.प्रति हजार लिटर पाणीपट्टी व 2 कोटी 12 लाख भरणा करताना नागरिकांची पाणीपट्टी न वाढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढील सात वर्षे या योजनेवरून नगरपंचायतीला पाणीपुरठा चालू होता. आता 15 जून 2025 पासूनचे लाईट बिल थकित असल्याने पाडाघर योजनेचे पाणी जिल्हा परिषदने बंद केले आहे.

मागील 9 वर्षात चार कोटी खर्च केले असा आरोप उबाठाच्या ठाकूर यांचा आहे. पण ठाकूर विसरतायत त्या 9 वर्षांपैकी 3 वर्षे तुमच्या उबाठाची सत्ता होती. त्यामुळे त्यांच्या जवळ खर्चाचा हिशोब, पहिला घ्यावा व त्यानंतर दुसऱ्यांवर आरोप करावा. त्या मुळे हर्षा ठाकूर शयांनी माझ्यावर कमिशनचे आरोप केले आहेत त्यांचे पुरावे पुढील पंधरा दिवसात जनतेला द्यावेत, नाहीतर जाहीर माफी मागावी अन्यथा मी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशारा त्यांनी हर्षा ठाकूर यांना या प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT