देवगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा 
सिंधुदुर्ग

Devgad Rain : देवगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा

जामसंडे व वाडा येथे घरांचे नुकसान; महिला जखमी

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दिवसभरात काल ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात विविध ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून एका महिलेला दुखापत झाली आहे.

जामसंडे -पाटकरवाडी येथे सखाराम कावले यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली. यावेळी त्यांच्या पत्नी सुनंदा कावले या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालय, देवगड येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेत घराच्या पडवीसह घराचेही नुकसान झाले असून संबंधित नुकसानीचा सविस्तर पंचनामा लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी, जामसंडे यांनी दिली. मौजे वाडा येथेही अतिवृष्टीमुळे अरुणा नरहर आचरेकर यांच्या घराचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नुकसानीची पंचयादी लवकरात लवकर सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT