सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथील श्रीमंत बापूसाहेब महाराज पुतळा शेजारच्या बाजूला लागून असलेल्या नाल्यामध्ये नगर परिषदेमार्फत काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या कृत्रिम पशु-पक्षी पर्यटन ठिकाण पर्यटकांचे लक्ष वेधत होते. हा परिसर एक पर्यटनाचा भाग बनला होता. या ठिकाणाची पुनश्चः नूतनीकरण करण्याची मागणी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केली आहे.
या नाल्यामध्ये बसविलेले काही पशु-प्राणी नाहीसे झालेले दिसतात. सदर परिसराचा मेंटेनन्स ठेवण्याची पूर्ण जबाबदारी ही नगरपरिषदेची होती, परंतु त्यांच्या दुर्लक्षेतेमुळे हे पर्यटन ठिकाण ओसाड बनले आहे.
याबाबत सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सावंतवाडी मोती तलावाच्या सुशोभिकरणासाठी 50 लाख 71 हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला असून, सदर मंजूर निधीमधून काही रक्कम वापरुन या पर्यटन ठिकाणाचे नूतनीकरण करावे,अशी मागणी रवी जाधव,ज्येष्ठ नागरिक व निसर्गप्रेमी यांनी केली आहे.