Dahi Handi Celebration (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात सिंधुदुर्ग दुमदुमला!

दहीहंडीच्या थरारात गोविंदांचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : ‘गोविंदा रे गोपाळा...’च्या जयघोषात शनिवारी दहीहंडी उत्‍सव जल्लोषात साजरा करण्यात आला आणि अवघा सिंधुदुर्ग दुमदुमुन गेला. जिल्ह्यात १५० हून अधिक ठिकाणी सार्वजनिक आणि खासगी तर ६ ठिकाणी राजकीय दहीहंडी फोडण्यात आल्या. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत दहीहंड्याचा थरार पाहायला मिळाला. या दहीहंड्या पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती.

शुक्रवारी जिल्ह्यात गोकुळ अष्टमी भक्‍तिमय वातावरणात साजरी करण्यात आली तर शनिवारी सकाळ पासूनच काल्यानिमित्त गोविंदांची लगबग सुरू झाली होती. ठिकठिकाणी नाक्यावर गोविंदांनी दहीहंड्या बांधल्या होत्या. दुपारनंतर डिजे आणि ढोल ताशांच्या गजरात आणि गोविंदांच्या गाण्यांच्या ठेक्यावर दहीहंड्याचा जल्लोष सुरू झाला. बालगोपाळ आणि गोविंदा यांनी रंगांची उधळण करत एकावर एक मानवी मनोऱ्यांचे थर रचण्यास सुरूवात केली. हे मानवी मनोरे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पारंपारिक आणि आधुनिकतेचा संगम साधत हा उत्‍सव साजरा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT