Sindhudurg Crime 
सिंधुदुर्ग

शिकरीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागून जागीच मृत्यू, तर दुसरा गंभीर

Sindhudurg Crime | वैभववाडी तालुक्यातील धक्कादायक घटना

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : शिकरीसाठी गेलेल्या तरुणाचा बंदूकीची गोळी लागून जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मृत तरुणाचे नाव सागर सुरेश पोटळे वय २६ तर जखमी तरुणाचे नाव कृष्णा सुरेश कातकर वय २५ असे आहे. दोघेही आचिर्णे घाणेगडवाडी तेथील रहिवाशी आहेत. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आचिर्णे घाणेगडवाडी येथे घडली आहे. गोळीबाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण वैभववाडी तालुका हादरून गेला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आचिर्णे गावातील कुर्ली धरणाच्या कालव्याजवळ हे तरुण शिकारीसाठी गेले होते. यावेळी हा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र ही गोळी नेमकी कोणाच्या बंदूकीतून कशी लागली याचा तपास पोलीस करीत आहेत. या गोळीबारात मयत सागर पोटळे याच्या चेहऱ्यावर व हातावर गोळ्या लागून त्याचा मृत्यू झाला, तर कृष्णा कातकर यांच्या अंगावर तब्बल अकरा ठिकाणी गोळ्या लागल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच मंगळवारी रात्री पोलीस निरीक्षक मनोज सोनावलकर यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हवालदार शैलेंद्र कांबळे, धनाजी धडे, अभिजीत तावडे, अजय बिलपे, मोहन राणे,श्री जांभळे,यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी बुधवारी सकाळी तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवमी साटम यांनी बुधवारी पहाटे घटनास्थळी भेट देऊन तपासबाबत पोलिसांना सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, श्वान पथक, ठसे तज्ञ यांच्या पथकाने ही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला असून, जखमी कृष्णा कातकर याच्यावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून त्याचा जबाब नोंदवण्याचे  काम सुरु असून हा गोळीबारचा प्रकार अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT