मालवण येथील युवती कणकवलीतून बेपत्ता  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : मालवण येथील युवती कणकवलीतून बेपत्ता

कणकवली पोलिसांत तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : वरवडे येथे मावस बहिणीकडे आलेली मुस्कान अब्दुल सोलकर (20, रा. मालवण) ही युवती बुधवारी सकाळी 11.45 वा. च्या सुमारास कणकवली ते मालवण जाणाऱ्या एसटी बसमधून मालवणला जाते असे सांगून निघून गेली ती तेथे पोहोचलेली नाही. दुपारी 1.30 वा.च्या सुमारास तिच्या आईने फोन करुन ती घरी पोहोचली नसल्याचे सांगितले. त्यानंतर शोध घेवूनही न सापडल्याने ती बेपत्ता झाल्याची खबर कौसर जहीर अब्बास ठाकूर (30, रा. वरवडे- खालची मुस्लिमवाडी) यांनी कणकवली पोलिसांत दिली.

मुस्कान हिची उंची 5 फुट 3 इंच, अंगाने सडपातळ, रंग निमगोरा, चेहरा उभट, केस काळे व लांब, अंगात जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व त्यावर पांढऱ्या रंगाचे डिझाईन, पायात काळे सँडल असून तिच्याकडे ओपो कंपनीचा मोबाईल आहे. अशा वर्णनाची युवती आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT