आठ कोटींची ‘व्‍हेल उलटी’ हस्‍तगत  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : आठ कोटींची ‘व्‍हेल उलटी’ हस्‍तगत

तिघांना अटक : वन विभागाची तळेबाजार येथे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : तळेबाजार (ता. देवगड) येथे ब्‍लू व्‍हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी आलेल्या तिघांना सहा. वनसंरक्षक (वन्‍यजीव) व वनक्षेत्रपाल कणकवली सापळा रचून मुद्देमालासह ताब्‍यात घेण्यात आले. त्‍यांच्‍याकडून ८.८०० कि.ग्रॅ. वजनाची सुमारे आठ कोटी रुपये किमतीची व्‍हेल माशाची उलटी हस्‍तगत करण्यात आली.

अटक केलेले संशयित देवगड तालुक्‍यातीलच आहेत. योगेश गणपत करंजेकर (४२, रा. इळये), विष्णू धाकू धुरत (३३) आणि संतोष काशीराम नाडणकर (५६, दोघेही रा.वरेली) अशी त्‍यांची नावे आहेत. कारवाई जिल्हा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्‍या नेतृत्‍वाखाली कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. पाटील, मठ वनपाल सावळा कांबळे, दिगवळे विभागाचे मंडळ वनपाल सर्जेराव पाटील, देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परिट, पोलिस हवालदार गौरेश राणे, मिठबांव वनरक्षक आप्‍पासाहेब राठोड, ठाकूरवाडी वनरक्षक रामदास घुगे, दिगवळे वनरक्षक प्रतिराज शिंदे, सागर भोजने, संग्राम पाटील व चालक अनिल गावडे, मंदार नाईक यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT