बांदा चेकपोस्टवर सव्वादोन लाखांची गोवा दारू जप्त; दोघांना अटक 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : बांदा चेकपोस्टवर सव्वादोन लाखांची गोवा दारू जप्त; दोघांना अटक

बांदा पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत २ लाख २२ हजार रू. ची गोवा दारू व १० लाखाची कार असा १२ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बांदा पोलिस अवैध मद्य वाहतुकीविरोधात सातत्याने धडक कारवाया करत आहेत.

रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास बांदा चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी सुरू असताना संशयावरून पुणे पासिंगची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार अडवून तिची झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला.या कारवाईत १० लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा तसेच सुमारे २ लाख २२ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा असा एकूण १२ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या दारूचा समावेश आहे. याप्रकरणी शुभम मुरलीधर बिरादार (२७, सध्या रा. हेरंभ, ता. देवणी, जि. लातूर (मूळ रा. बिदर, कर्नाटक) आणि अजय विनायक सांगळे (२६, रा. आरवली, ता. वेंगुर्ला) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम आणि पविभागीय पोलीस अधिकारी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नाईक, हवालदार कानडरकर, हवालदार परब, पोलिस शिपाई प्रसाद पाटील आणि राजाराम कापसे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT